ब्रेकींग! प्रयागधाम मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडले! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने तीन जणांना अटक, दोन महिलांचाही समावेश…

उरुळी कांचन : कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील प्रयागधाम(ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदार केंद्रावर मतदान प्रक्रियेला काळीमा फासणारा गंभीर प्रकार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समोर आणला आहे.

भेकराईनगर , फुरसुंगीतील बनावट ओळखपत्र तयार करुन हे मतदार प्रयागधाम मतदान केंद्रावर मतदानासाठी आले असता त्यांना रंगेहाथ पकडले आहे.
मतदान सुरू असतानाच बोगस ओळखीवर मतदान करण्याचा प्रयत्न करणारे तीन मतदार सतर्क नागरिकांच्या साहाय्याने भरारी पथकाने रंगेहाथ पडकले आहे. यात दोन महिलांचाही समावेश आहे. तर इतर तीन जण घटनास्थळावरून पसार झाले.

स्थानिक नागरिक व सजग मतदारांनी संशय व्यक्त केल्यानंतर ही बाब निवडणूक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आली. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींकडे सादर केलेली ओळखपत्रे संशयास्पद असल्याचे उघड झाले.
तत्काळ कारवाई करत निवडणूक अधिकाऱ्यांनी तीन बोगस मतदारांना ताब्यात घेतले. मात्र, गोंधळाचा फायदा घेत इतर तीन जण घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निवडणूक यंत्रणेच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला जात आहे.
पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, पकडलेल्या बोगस मतदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेला गालबोट लावणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.