स्व. अजित पवार यांच्या हवेलीतील विकासाचे अपुरे स्वप्न सुनेत्रा पवार पूर्ण करणार; आमदार ज्ञानेश्वर कटकेंनी सोरतापवाडीत दिले आश्वासन…

उरुळीकांचन : स्व. अजित पवार यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या स्वप्नांत हवेली तालुक्याचा परिपूर्ण विकास व्हावा , हे स्वप्न पाहिले होते, तालुक्यात लोकसंख्येची व दळणवळणाची प्रचंड व्यापकता म्हणून त्यांनी जिल्हाप्रशासनाच्या प्रत्येक बैठकीत योग्यरीत्या कार्यवाही व्हावी म्हणून त्यांचा कटाक्ष ठेवला होता.

मेट्रोची रचना उरुळीकांचन पर्यंत व्हावी तर तालुक्यातील यशवंत कारखान्याचा प्रश्न सुटावा म्हणून हे प्रयत्न त्यांनी अंतिम टप्प्यात आणले आहेत. हवेलीतील त्यांचे अधुरे कार्य सुनेत्राताईंकडून पूर्ण करणार असून त्यांनी दिलेले उमेदवार निवडून देऊन भविष्याची वाटचाल भक्कम करावी अशी साद आमदार शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी घातली आहे.
उरुळीकांचन – सोरतापवाडी जिल्हा परिषद गटातील उमेदवार जितेंद्र बडेकर व सोरतापवाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार आण्णा महाडीक यांच्या प्रचारार्थ सोरतापवाडी , तरडे व उरुळीकांचन या ठिकाणी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. या प्रचारार्थ सोरतापवाडी (ता.हवेली ) येथील सभेत आमदार ज्ञानेश्वर कटकेंनी मतदारांना आव्हान केले.

सभेला पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप,पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रय उर्फ बाळासाहेब चौधरी, ज्येष्ठ नेते रामदास चौधरी, बाळासाहेब चोरघे, सोनबा चौधरी, ‘यशवंत’ चे संचालक संतोष कांचन , शशिकांत चौधरी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र चौधरी, अमित चौधरी, राजेंद्र तानाजी चौधरी, नवनाथ आढाव, अमोल चौधरी, बंडू चौधरी, देवेंद्र चौधरी, प्रविण चोरघे आदी उपस्थित होते.
आमदार ज्ञानेश्वर कटके म्हणाले, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तयारीसाठी येताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघात घडून त्यांचे अकस्मित निधन होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महाराष्ट्राच्या विकासात गेली २५ ते ३० वर्षे योगदान दिलेला हा नेता अकस्मित निघून जाणे हे राज्याचे पर्यायाने जिल्ह्याचे मोठे नुकसान होणारी विलक्षण घटना आहे. त्यांच्या निधनाने जिह्याच्या नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण करणारी आहे.
त्यांची विकास व समाजाच्या बद्दल असलेली धडपड ही त्यांच्या कार्याची ओळख बनली आहे. कामाचा माणूस ही त्यांची प्रतिमा नागरीकांचे लहान प्रश्नांची ही सोडवून करण्यासाठी तिककीत उपयुक्त असल्याचे जनतेने पाहिले आहे. आज त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची असून त्यांनी हवेली तालुक्याचा पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून त्यांनी अंतिम टप्प्यात आणलेला यशवंत कारखान्याचा प्रश्न असो की, मेट्रोला उरुळीकांचन पर्यंत आणण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले.
सोरतापवाडी भाग नर्सरी क्लस्टर करणार…
स्व. अजित पवार यांनी सोरतापवाडी ग्रामपंचायतीचा सामावेश स्वतः च्या काटेवाडीनंतर दुसरे स्मार्ट व्हिलेज गाव म्हणून हे गाव निवडल्याने या गावचा नावलौकिक जिल्ह्यात वाढणार आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी मूळ व्यवसाय झालेल्या नर्सरी उद्योगाला आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारपेठ व ग्राहकांना सुविधा मिळाव्यात म्हणून नर्सरी क्लस्टर या ठिकाणी उभा करण्याचा संकल्प आहे. आगामी अधिवेशनात सभागृहात विषय मांडुन अर्थसंकल्पात निधीची तरतूद करुन या उद्योगाला व्यापाराशी जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार कटके सांगितले.
‘यशवंत’ फाईल अनेकवेळा लपविली….
‘यशवंत’ कारखान्याचा प्रश्न अजित पवार हे सोडवित असले तरी या कारखान्याचे काम होऊ नये म्हणून प्रयत्न झाल्याचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सभेत सांगितले. कारखान्याची पुणे बाजार समितीची जमिन खरेदी करुन कारखाना सुरू करण्यासाठी फाईल ही अनेकवेळा अधिकाऱ्यांनी दडवून ठेवल्याचे ते म्हणाले. परंतु अजित पवार यांचे हे स्वप्न सुनेत्रा पवार यांच्या हातातून घडणार असल्याचे ते म्हणाले.
