धक्कादायक! मुंबईतल्या IIT बॉम्बेमध्ये विद्यार्थ्यानं नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांकडून तपास सुरू…

मुंबई : मुंबईतल्या प्रसिद्ध अशा आयआयटी बॉम्बे शिक्षण संस्थेत विद्यार्थी आत्महत्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच आता हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारून एका विद्यार्थ्याने आपलं आयुष्य संपवल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, IIT बॉम्बेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचल असल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचा जास्त रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
पोलिसांकडून विद्यार्थी ज्या हॉस्टेलमधील खोलीत राहत होता त्या खोलीची तपासणी सुरू आहे. विद्यार्थ्याचा मोबाईल, लॅपटॉप, त्यांच्या रुममधील वस्तू यांची तपासणी पोलिस करत आहेत. ऑगस्ट २०२५ मध्ये देखील एका विद्यार्थ्याने अशाच पद्धतीने आत्महत्या केली होती. या शिक्षण संस्थेत विद्यार्थी आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान विद्यार्थ्याच्या कुटुंबींयाना घटनेची माहिती देण्यात आली आहे. या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे पवई आयआयटी बॉम्बेमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत.
