राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा निर्णय सार्थ ठरवून दाखवू ; विजयानेच दादांना खरी श्रध्दांजली देऊ ; कृषीराज उर्फ मनोज चौधरी यांचा आत्मविश्वास ..


उरुळी कांचन : कोरेगाव मूळ गण हा शहरी व ग्रामीण अशा दोन विभागात विभागला गेला आहे.त्यामुळे महामार्गाच्या बाजूला नागरीकरण वाढले असले तरी, ग्रामीण भागातील शेतकरी, वीज, शेतीसाठी लागणारी अवजारे आणि पाणी व्यवस्थेसारखी मूलभूत समस्या यापुढील काळात नक्कीच सोडवणार असल्याचे प्रतिपादन कोरेगाव मूळ गणातील पंचायत समिती राष्ट्रवादीचे उमेदवार कृषीराज उर्फ मनोज चौधरी यांनी केले आहे.

कोरेगाव मूळ पंचायत समितीची निवडणूक आता निर्णायक टप्प्यात पोहचली आहे. पंचायत समितीचे राष्ट्रवादी उमेदवार कृषीराज चौधरी यांनी ग्रामीण व नागरी भागातील विकासाचा ठोस अजेंडा मांडत मतदारांचे लक्ष वेधले आहे.

ग्रामीण भागातील मूलभूत समस्या सोडवण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वच उमेदवार सातत्याने पुढाकार घेत आहेत. आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, वीजपुरवठा, शेती, महिला सक्षमीकरण आणि समाजकल्याण या मुद्द्यांवर त्यांनी ठोस धोरणे मांडली आहेत. त्यामुळे मतदार या स्पष्ट आणि परिणामकारक भूमिकेने प्रभावित झाले आहेत. ही निवडणूक फक्त राजकीय मत देण्याची नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याची संधी आहे.”

शेती व शेतकरी प्रश्नांवर कृषीराज चौधरी यांनी पाणी व्यवस्थापन, वीजपुरवठा, रस्ते आणि बाजारपेठेशी जोडणी या बाबींवर ठोस काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागरी सुविधांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन या समस्यांवरही प्राधान्य दिले जाणार आहे.

“दादांचे निधन राज्यासाठी मोठा धक्का आहे, पण दादांनी शिकवल्याप्रमाणे आम्ही रडत बसणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला लढण्याचे बळ अजित दादांनी दिले आहे. या निवडणुकीत आम्ही दादांच्या कार्याची खरी श्रद्धांजली देणार आहोत.”

दरम्यान, कृषिराज चौधरी म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच हवेली तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे फक्त राजकीय नेते नव्हते; ते जनतेसाठी ‘कामाचे दादा’ होते. त्यामुळे अजितदादांच्या मार्गदर्शनाखालील आम्हीही ठोस धोरणे आणि विकासाच्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून मतदारांचा विश्वास मिळवण्याचे काम जोरदारपणे सुरू ठेवले आहे.

“दादांना खरी श्रद्धांजली म्हणून मतदारांनी या निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे असे चौधरी म्हणाले. अशा दोन विभागात विभागला गेला आहे त्यामुळे महामार्गाच्या बाजूला नागरीकरण वाढले असले तरी, ग्रामीण भागातील शेतकरी, वीज, शेतीसाठी लागणारी अवजारे आणि पाणी व्यवस्थेसारखी मूलभूत समस्या यापुढील काळात नक्कीच सोडवणार असल्याचे प्रतिपादन कोरेगाव मूळ गणातील पंचायत समिती राष्ट्रवादीचे उमेदवार कृषीराज उर्फ मनोज चौधरी यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!