अजितदादांचं निधन, पुणे आज-उद्या बंद, महानगरपालिका आयुक्तांचा मोठा निर्णय…

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात विमानातील सर्व जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.

तसेच अजित दादांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 दिवस शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यानंतर आता अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुणे शहर आज आणि उद्या असे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे महानगरपालिका प्रशासनाने अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आशिया खंडातील महत्त्वाची बाजारपेठ असलेले पुणे मार्केट यार्ड देखील दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती व्यापारी असोसिएशनने दिली आहे. बारामतीतील व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळला आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणीही बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यावर शोककळी पसरली आहे. पुण्यात अजित पवारांच्या कार्यकर्तांकडून महाराष्ट्राचा धुरंदर नेता हरपला अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. संपूर्ण शहरात सध्या दुःखद वातावरण पसरले आहे.
