प्रतीक्षा संपली! फेब्रुवारी महिन्यात येणार पीएम किसानचे 2000 रुपये, मात्र e -Kyc बंधनकारक….


पुणे : भारतातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जात. आता या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत मिळणाऱ्या 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे.फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले जाणार आहेत.

पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता मिळवण्याआधी तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाहीत. काही वेळा ई केवायसी अर्धवट केल्यानंतर हप्ता थांबवला जाऊ शकतो. याचसोबत जमिनीचे व्हेरिफिकेशन करणेदेखील गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.

पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची मदत दिली जाते.ही रक्कम तीन समान हफ्त्यात थेट जमा केली जाते. मागील हप्त्याच्या वेळापत्रकानुसार दर चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो.त्यानुसार बाविसावा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, काही राज्यांमध्ये फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे.

जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर योजनेचा लाभ मिळत नाही. याचसोबत बँक खाते आणि आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे. जर यामध्ये कोणती अडचण असेल तर हप्ता मिळणार नाही. तुम्ही केवायसी वेबसाइटवरुन करु शकतात. याचसोबत तुम्हाला पैसे मिळणार की नाही याचा स्टेट्‍स चेक करु शकतात. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांचा हप्ता अडू नये यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!