ब्रेकिंग! महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी 20 हजार पानांच आरोपपत्र, तरीही भुजबळांची निर्दोष मुक्तता…..

पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.ईडीकडून महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत भुजबळ यांच्यासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

काय आहे महाराष्ट्र सदन घोटाळा?


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामामध्ये अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला होता.याप्रकरणी भुजबळ हे दोन वर्ष जेलमध्ये देखील होते. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्यासह एकूण 14 जणांची नावं होती. हा कथीत घोटाळा अंदाजे 850 कोटी रुपयांचा असल्याचं बोललं जातं, या प्रकरणात आरोप झाल्यानं छगन भुजबळ चांगले अडचणीत आले. या प्रकरणात आधी त्यांना एसीबीकडून दोष मुक्त करण्यात आलं, त्यानंतर आता त्यांना इडीने देखील दिलासा दिला आहे.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांच्या कोर्टाने छगन भुजबळ आणि इतरांनी दाखल केलेला निर्दोष मुक्तीचा अर्ज मंजूर केला आहे. या निकालाचा मुख्य आधार प्रेडिकेट ऑफेन्स हा तांत्रिक मुद्दा ठरला. कायद्यानुसार जर मूळ कायदा टिकू शकला नाही किंवा त्यातून आरोपीचे मुक्तता झाली तर त्या आधारावर सुरू असलेली ईडीची मनी लॉन्ड्रीची केस देखील उभे राहू शकत नाही. त्यामुळे एसीबीने दाखल केलेल्या या प्रकरणात आधीच दिलासा मिळाल्यामुळे ईडीची केसमध्ये ही भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्याचा मार्ग मोकळा झाला.
महाराष्ट्र सदनाच्या या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने छगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे 13.5 कोटी रुपयांची लाच घेतली होती.तसेच या प्रकरणाचा तपास करताना यंत्रणांनी सुमारे 20000 पानाचं आरोप पत्र दाखल केलं होतं तसेच यामध्ये 60 साक्षीदारांचा जबाबाचा समावेश देखील होता. तरीही ईडीची केस कशी फसली अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
