मतदानानंतर शाई कसकाय पुसली जातेय? नेमकं कारण काय? महत्वाची माहिती आली समोर…

मुंबई : राज्यात आज महानगरपालिका निवडणूक पार पडत असून आज मतदान केंद्रावर अनेक घोळ समोर आले आहेत. यामुळे संशय बळावला आहे. महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी जी शाई वापरली जातेय त्या बद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत. यामुळे निवडणूक आयोगावर आरोप केले जात आहेत.

अनेक राजकीय पक्षांनी मतदानासाठी बोटाला लावल्या जाणाऱ्या शाईवर आक्षेप घेतला आहे. मतदान केल्यानंतर काही वेळाने ही शाई पुसली जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. आधीच संशयाच्या भोवऱ्यात असलेले निवडणूक आयोग पुन्हा एकदा टीकेचे धनी बनले आहेत.
याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शाई निघत असल्याचा आरोप राज्य निवडणूक आयुक्तांनी फेटाळून लावला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग जी शाई वापरतोय, तीच शाई आम्ही वापरतोय. ही शाई काढता येत नाही, असा दावा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केला.मात्र यावर कोणाचे समाधान झाले नाही.

एकदा मतदान करुन गेल्यानंतर पुन्हा मतदान करण्यासाठी एखादा आला, तर मतदान केंद्र अधिकारी त्यावर नक्कीच कारवाई करेल असं दिनेश वाघमारे म्हणाले. मात्र अनेक ठिकाणी बोगस दुबार मतदान असल्याचे विरोधकांनी सांगितले आहे. यामुळे येणाऱ्या काळात यावरून राजकीय वातावरण तापणार आहे.
दरम्यान, लोकसभा, विधानसभेच्या वेळी सुद्धा अशाच प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. शाई ड्राय झाल्यानंतर पुसली जात नाही. 2011 पासून आम्ही एकाच कंपनीचं मार्कर पेन वापरत आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र अनेक ठिकाणी शाई पुसल्याचे दिसून आले आहे.
