ठाकरे बंधूकडून मतदानासाठी ‘भगवा गार्ड’ तैनात ; फडणवीसांचा आक्रमक इशारा, नेमकं काय म्हणाले?


मुंबई: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहेत. या मतदानातील दुबार मतदान टाळण्यासाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘भगवा गार्ड’ तैनात केला आहे.दुबार मतदार दिसताच त्याला ठोका, अशा सूचना राज ठाकरेंकडून देण्यात आल्या आहेत. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं हे पाऊल उचलल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार समाचार घेत आक्रमक इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईत कोणीही दहशत निर्माण करू शकत नाही. आता तेवढी त्यांची क्षमताही नाही. हे काय दहशत निर्माण करतील? यांच्यात तेवढी क्षमता राहिलेली नाही आणि कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाच तर पोलीस त्यांना ठोकून काढतील,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भगवा गार्ड नावाने जी कोणती ब्रिगेड तयार केलीय ती सिलेक्टिव्ह आहे. ही ब्रिगेड मालवणी वगैरेसारख्या ठिकाणी दिसत नाही. मात्रमुंबई किंवा कोणत्याच शहरातील दहशत खपवून घेतली जाणार नाही. दुबार मतदार असं ते म्हणतायत, पण तुमच्याकडे काय माहिती आहे त्याबद्दल? दुबार मतदार कोणी शोधले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मतदान कमी होण्यासाठी ठाकरे बंधूंचा हा प्रयत्न असल्याचा त्यांनी म्हटल आहे.मतदान केंद्रावर तुमचा जो एजंट असतो त्याने दुबार मतदाराबद्दल आक्षेप घेतला पाहिजे. आम्हीही अशा दुबार मतदारांबद्दल आक्षेप घेऊ. पण आम्ही मारामाऱ्या करू, हा कोणता प्रकार आहे? मतदान कमी होण्यासाठीचा सर्व काही सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्र्‍यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!