कोल्हापूर हादरलं!मुख्याध्यापकाच्या कृत्याने शिक्षकी पेशाला काळीमा, अल्पवयीन विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेलं अन्……

कोल्हापूर: गेल्या काही दिवसापासून राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच आता कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादाय घटना समोर आली आहे. एका मुख्याध्यापकांन अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे.याप्रकरणी मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कृष्णा ज्ञानू दाभोळे (वय 55, रा. सावर्डेकर कॉलनी, मुरगूड, ता. कागल) असं त्या मुख्याध्यापकाच नाव आहे.सोळा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेत इयत्ता दहावीपर्यंत शिकत होती. तिचे वडील वारले असून, आई, एक बहीण आणि फक्त तीच घरात राहतात. आई आजारी असल्याने ती कोल्हापुरात परतली.याचा फायदा घेत संशयित दाभोळे याने आईच्या तब्येतीची विचारपूस करत विद्यार्थिनीशी संपर्क वाढवला. पीडितेच्या घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने तिच्यावर अत्याचार केला.
दाभोळे हा आश्रमशाळेचा मुख्याध्यापक असून, शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्याने उलट आपल्याच विद्यार्थिनीसोबत केलेल्या कृत्याने संतापाची लाट पसरली आहे. त्याने आपल्या मुलाच्या कोल्हापुरातील फ्लॅटवर विद्यार्थिनीला बोलावून तिला वासनेची शिकार बनवले.

अत्याचारादरम्यान त्याने पीडितेला कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली होती. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात संतापाची लाट उसळली असून, पालकांनी सखोल चौकशी आणि कडक कारवाईची मागणी केली आहे.