सर्वसामान्यांना धडकी! सोन्या-चांदीचे भाव कडाडणार, सोने तब्बल 2 लाख तर चांदी थेट 3 लाखावर…

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 2025 या सालात सोन्याने तब्बल 66 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत. तर चांदीने वर्षभरात 171 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. तज्ज्ञांच्या मते आगामी काळात सोनं 2 लाख तर चांदी थेट 3 लाखावर पोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

येणाऱ्या काळात सोन्याचा भाव 1.70 लाख रुपये ते 2 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाण्याची शक्यता आहे.चांदीचा भावदेखील भविष्यात 100 डॉलर्स प्रति औंसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच चांदीचा भाव 2.8 लाख रुपये ते 3.3 लाख रुपये प्रति किलोवर जाऊ शकतो. त्यामुळे भविष्यात सोने आणि चांदीमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोने चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सामान्यांना धडकी भरत आहे.2025 सालात तर या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत तुफान वाढली. आता नव्या वर्षातही सोन्याचा भाव वाढणार आहे.
