बडतर्फ IAS पूजा खेडकरच्या पुण्यातील घरी जबरी चोरी ; नोकरान आई वडिलांना बेशुद्ध करत…,


पुणे : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त आयएएस अधिकारी बडतर्फ पूजा खेडकर चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.अशातच आता खेडकरच्या पुण्यातील घरात रविवारी मध्यरात्री चोरीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घरातील एका नोकराने पूजाच्या आई वडिलांना बेशुद्ध करून तिचे हातपाय बांधले आणि घरी चोरी करण्यात आली.एका बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याच्या घरी अशाप्रकारे जबरी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, खेडकर कुटुंबाच्या घरातील एका नोकराने पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केलं. तसेच पूजा खेडकर यांना दोरीने बांधून घरात चोरी केली आहे. या घटनेची माहिती पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

पुण्यातील बाणेर रस्त्यावर खेडकर कुटुंबाच्या बंगल्यात कुटुंबासह काही नोकर राहतात. त्यातील एक नोकर आठच दिवसांपूर्वी नेपाळहून आला होता. त्या नोकराने काल रात्री गुंगीचे औषध देऊन दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केले आणि आपल्याला बांधून ठेवले. त्यानंतर तो चोर घरातील सर्वांचे मोबाईल घेऊन पसार झाला, असं पूजा खेडकरांचं म्हणणं आहे.

दरम्यान मध्यरात्री झालेल्या या चोरीच्या प्रकारानंतर खेडकर कुटुंब हादरून गेले आहे.आपली मनस्थिती ठीक झाल्यानंतर आपण तक्रार दाखल करू, अशी माहिती पूजा खेडकरने पोलिसांना दिली आहे. घरात चोरी झाल्याची माहिती देणाऱ्या पूजा खेडकर यांनी गुन्हा दाखल न केल्याने विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!