जिल्हा परिषदेचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर न झाल्याने संभ्रम वाढला! कोर्टाची ३१ जानेवारीची डेडलाईन ओलंडणार! इच्छुकांचा करोडोंचा खर्चाचा डोलारा अंगाशी…


जयदिप जाधव

उरुळीकांचन : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्या निवडणुका ३१ जानेवारी २०१६ पर्यंत पूर्ण करण्याच्या अंतरीमआदेश दिला असतानाही राज्य निवडणुक आयोगाने ही निवडणुक ३१ जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश पाळला नसल्याचे आज स्पष्ट झाले असून नियमानुसार किमान २२दिवसांत निवडणूक पूर्ण करण्याचा अपेक्षांना आज ८ जानेवारी राज्य निवडणूक आयोगाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा संभ्रम कायम असून निवडणुका जाहीर होत नसल्याने गेली तीन महिने मतदारांवर सुरू असलेल्या खर्चाच्या खिरापतीने उमेदवार हतबल झाले आहे.

राज्यात महानगरपालिकांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूका झालेली आरक्षण सोडत ,प्रभाग रचना व मतदारयाद्यांच्या कार्यक्रमाने महानगरपालिकांपूर्वी होणे अपेक्षित असताना महापालिकांच्या आरक्षण, प्रभागरचना प्रक्रिया उशीरा होऊनही राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांचा कार्यक्रम आधी घेतला. जिल्हा परिषदेच्या पन्नास टक्के आरक्षण मर्यादा न ओलंडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून होतील अशी अपेक्षा असताना न्यायालयाच्या निर्णयाला ३१ जानेवारीची मुदत संपताना किमान २२ दिवसांचा कार्यक्रम कालावधी लावण्याची शक्यता मावळल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका हा विषय निवडणूक आयोगाच्या अस्पष्ट धोरणाने करमणूकीचा विषय झाला आहे.

वास्तविक राज्यात जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण मर्यादा न ओलांढलेल्या जिल्हा परिषदांची निवडणुका घेण्यास मुभा दिला आहे. चक्राकार आरक्षण पध्दतीच्या २१ जानेवारी २०२६ रोजीच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून निवडणुका पूर्ण कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. मात्र आयोगाने किमान २२ दिवसांची निवडणूक कालावधीची प्रक्रिया पूर्ण न केल्याने निवडणुकीचा संभ्रम वाढला असून राज्य निवडणूक आयोग आता ७ फेब्रुवारी कालावधी ठरुन निवडणूक घेणार की निवडणुकीचा एप्रिल महिना उजेडणार म्हणून इच्छुकांचे जीव टांगणीला लागले आहेत.

पुणे जिल्हापरिषदेला खर्च करुन उमेदवार हैराण…

पुणे जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांची दिलेली ३१ जानेवारी २०२६ डेडलाईन गृहीत धरुन इच्छुकांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. देवदर्शन,सहली, शिबीरे घेऊन तयारीचा बार उडविला आहे. अगदी उत्तर भारत ते दक्षिण भारत यात्रांनी मतदारांना पावन करुन घेतले आहे. मतदारांची एक नव्हे तर सर्व उमेदवारांनी इच्छा पूर्ण केली आहे.त्यामुळे करोडोंचे खर्च मात्र तारीख जाहीर नसल्याने मतदारही उमेदवारांना स्वस्त बसून देत नसल्याने इच्छुकांचे खर्च करुन कंबरडे मोडले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!