जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी? निवडणूक आयोग कोर्टात देणार महत्त्वाची माहिती

पुणे:सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.अशातच आता या निवडणुकांच्या तारखाबाबत निवडणूक आयोग कोर्टामध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती देणार असल्याचे समोर आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या महापालिकाच्या निवडणुकांचे बिगुल वाजल असताना जिल्हा परिषदांच्या निवडणुकासाठी मनुष्यबळ अपुरी पडत असल्याने या निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशातच निवडणूक आयोगाने आज प्रशासनाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महानगरपालिकांची मतमोजणी, त्यावेळी अपेक्षित असलेली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती, याबरोबरच जिल्हा परिषद निवडणुकांच्या संभाव्य तारखांची चर्चा होणार आहे.

या चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांकडून महापालिका निवडणुकांनंतर लगेचच जिल्हा परिषद निवडणुका घेणे शक्य होईल काय, याबाबत विचारणा केली जाण्याची शक्यता आहे.कोर्टाने जानेवारीमध्ये निवडणुका घ्याव्या, असा आदेश दिला असला तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानले जात आहे.
आता जिल्हा परिषदा निवडणुकांच्या अनुषंगाने निवडणूक आयोग कोर्टात काय माहिती देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.