ब्रेकिंग! सरकारचा लाडक्या बहिणींना दणका; ‘या’ लाडकींकडून पैशाची वसुली, कारवाई होणार?

पुणे: महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोलाचा वाटा ठरला. या योजनेतून महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम निश्चित केले असताना देखील निकषांबाहेर जाऊन अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे.या सरकारी कर्मचाऱ्यांकडून पैसे वसुली केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेबाबत शासनाकडून महिला व बालकल्याण विभागाला विविध विभागात कार्यरत असलेल्या १९६ कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती. १९६ महिलांनी योजनेचा निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्या प्रकरणाची चौकशी केली असता १९० कर्मचारी हे अर्धवेळ आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे आढळल्याने ते पात्र ठरले आहेत. तरीही निकषा बाहेर जाऊन सरकारी कर्मचाऱ्यांनीं लाभ घेतल्याने त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात शासकीय कर्मचारी असताना देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, उर्वरित 6 शासकीय कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची प्रत्येकी १६ हजार ०० असे एकूण ९९ हजार रुपये रक्कम वसूल करण्यात आले आहेत.या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

त्यामुळे लवकरच त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे, त्यामुळे शासनाची फसवणूक करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे या कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. या महिलांकडून पैसे वसूल करण्यात आले आहे.