‘ही शेवटची निवडणूक……; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ

मुंबई: आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगर परिषद-नगर पंचायतीनंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. सगळ्यांचे लक्ष मुंबई महापालिकेकडे लागले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक मराठींसाठी शेवटची निवडणूक ठरू शकते असे त्यांनी म्हटले आहे.त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेकडून आयोजित कोकण महोत्सवात बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय हालचालींबाबत सावधगिरी बाळगण्याची सूचना करताना मनसैनिकांना गाफील न राहण्याची सूचना केली आहे.त्यांनी असे म्हटले की, ही आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक मराठींसाठी शेवटची निवडणूक ठरू शकते. आपण गाफील राहिलो तर मुंबई हातातून गेली, असंच समजा असा इशारा त्यांनी दिला. मुंबई ही मराठी जनतेच्या हातातून गेल्यास ही लोक (सत्ताधारी) “थैमान घातलं जाईल” असा इशारा देत त्यांनी मराठी मतदारांना जागं राहण्याचं आवाहन केलं आहे..
दरम्यान. मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता असणार, याकडे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपकडून मुंबईचा महापौर हिंदू होणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर बीएमसी निवडणुकीत हिंदुत्व, हिंदू-मुस्लिम मुद्दा रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर, दुसरीकडे विरोधकांकडून भाजप नेत्यांच्या या वक्तव्यावर टीका केली जात आहे.
