राज्यात कडाक्याची थंडी पडल्याने अंड्याच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या…


पुणे : राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर थंडी वाढली असून त्यामुळे एकीकडे अंड्यांना मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अंड्याचे भाव कडाडले आहेत. थंडीत अंड्यांना सकस आणि उब देणारा आहार म्हणून पाहिले जाते.

कोंबडीच्या अंड्यांना थंडीत प्रचंड मागणी असते त्यामुळे पुरवठा आणि मागणी यांच्या संतुलन बिघडून अंड्याचे दर थंडीत कडाडतात. आता राज्यातील अंड्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

अंडी खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. अंड्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने अंड्याचा तुडवटा झाला आहे.त्यामुळे अंड्यांचे दर वाढले आहेत. महाराष्ट्रात अंड्याचे दर ऐतिहासिक स्तरावर पोहचले आहे.

मागणी वाढल्याने अंडी महागल्या या व्यापारातील तज्ज्ञ सांगतात. छत्रपती संभाजीनगरात किरकोळ भाव प्रति अंडी ७ रुपयांवर पोहचले आहे. राज्यात अन्य भागातही अंड्यांच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरात अंड्याचे दर १७०, १८० रुपयांवरून सव्वा दोनशे रुपये कॅरेट झाले आहे. अंड्याचे किरकोळ दराकडे पाहाता. हेच दर एका अंड्यामागे आता आठ ते नऊ रुपयांपर्यंत पोहचले आहेत. थंडीच्या दिवसात अंड्याना जास्त मागणी असते आणि अंड्याचे भाव जरी वाढले असले तरी विक्रीकर याचा परिणाम झाला नसल्याचे अंडे व्यापारी सांगत आहेत.

अंड्यांच्या कमतरता आणि वाढत्या किंमतीमुळे राज्यातील लोकांचे टेन्शन वाढले आहे. जे लोक अंड्यांचा नेहमी आहारात वापर करतात त्यांना आता जास्त पैसे मोजून अंडी खरेदी करावी लागणार आहेत. अंड्यांचा पुरवठा नियमित होण्यासाठी अन्य राज्यांना अंड्यांचा पुरवठा वाढवण्यास सांगण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!