पीएम किसानच्या यादीतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळलं, यादीत नाव कसं तपासायचं? जाणून घ्या…

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याचे 2000 रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत. देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 21 व्या हप्त्यासाठी 18000 कोटी रुपये वर्ग करण्यात येणार आहे.

पूरस्थितीमुळं यापूर्वी चार राज्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात 21 व्या हप्त्याची रक्कम पाठवण्यात आली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मी राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वीच पीएम किसानचा 21 वा हप्ता मिळाला आहे.
याद्वारे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक सहाय्य मिळेल, जे त्यांच्या शेतीसाठी आणि जीवनव्यवस्थेसाठी उपयोगी ठरेल. पण त्याचवेळी महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना मात्र पीएम किसान योजनेच्या यादीतून वगळल्याची माहिती समोर आली आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवीन अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने आधार, प्राप्तिकर आणि शिधापत्रिका यादीतील माहितीच्या आधारे शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे.
येत्या तपासणीतून काही शेतकरी योजनेच्या निकषांमध्ये अपात्र ठरल्याने अडीच लाख शेतकऱ्यांची नावे 21 व्या हप्त्याच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. यामुळे महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, त्यांच्या नावाचा समावेश पीएम किसान योजनेच्या यादीत आहे की नाही. योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव कसे तपासायचे हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध ऑनलाइन सुविधा वापरून सहज पाहता येईल.
पीएम किसानच्या यादीत नाव कसं शोधायचं?
स्टेप १ : तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या https://pmkisan.gov.in/rpt_beneficiarystatus_pub.aspx या वेबसाईटला भेट द्या.
स्टेप २ : राज्य निवडा असा पर्याय आहे त्यात महाराष्ट्राची निवड करा.
स्टेप ३ : तुमचा जिल्हा निवडा.
स्टेप ४ : तालुका निवडा.
स्टेप ५ : गावाचं नाव निवडा, यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. यानंतर तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी ओपन होईल. या यादीत तुमचं नाव शोधा.
या माहितीमध्ये, तुमचे नाव यादीत आहे की नाही, शेवटचा हप्ता कधी मिळाला आणि पुढील हप्त्याची स्थिती तुम्हाला कळेल.
जर साइटवर ‘नो रेकॉर्ड सापडला नाही’ असे दिसत असेल, तर समजून घ्या की तुमचे नाव सध्या यादीतून काढून टाकण्यात आले आहे किंवा पडताळणीच्या अधीन आहे.
या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून वगळण्यात येईल. कृषी मंत्रालयाने केलेल्या तपासणीत असे दिसून आले आहे की अंदाजे ३.१ दशलक्ष शेतकरी ज्यांची नावे संशयास्पद आढळली आहेत. यापैकी पती-पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेत होते. यामध्ये १.७६ लाख अल्पवयीन मुले देखील समाविष्ट आहेत. सरकारने सर्व राज्यांना १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चौकशी पूर्ण करण्याचे आणि चुकीचे लाभार्थी काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.