बारामतीकरांना मोठा दिलासा; जनाई शिरसाई उपसासिंचन योजनेच्या पाईपलाईनचे तब्बल 359 कोटीचं टेंडर, अजित पवारांनी शब्द पाळला..


पुणे: गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला बहुचर्चित जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.या जनाई उपसासिंचन योजनेचे कालवा आणि जलवाहिनीचे कामाचे टेंडर चासकमान पाटबंधारे विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले असून 359 कोटींचे हे टेंडर 14 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे बारामतीच्या जिरायती भागाला याचा मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी या कामाचा प्रश्न मार्गी लागू असं आश्वासन दिलं होतं त्यानंतर अखेर त्यांनी आपला शब्द पाळला आहे.

बारामतीतील जिरायत भागासाठी वरदान ठरणाऱ्या बहुचर्चित जनाई उपसा सिंचन योजनेच्या मुद्द्यावरून बारामती तालुक्यातील अनेक निवडणुका लढल्या गेल्या. येथील शेतकऱ्यांची अस्मिता जागी केली गेली. अगदी लोकसभा, विधानसभा निवडणूक देखील याच मुद्द्यावर येथे लढली जाते. त्यामुळेच विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनाही आता लक्ष केले होते गेले. अनेक वर्ष हे नेते सातत्याने लोकांची दिशाभूल करत आहेत असा आरोपही होत होता. त्यानंतर आता या योजनेला अखेर यश आल आहे.कालवा आणि जलवाहिनीचे कामाचे टेंडर चासकमान पाटबंधारे विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले असून 359 कोटींचे हे टेंडर 14 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागणार असून बारामती भागातील शेतीसाठी हे काम वेगाने झाल्यास मोठे वरदान ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी कामाचा माणूस आहे अशी टॅगलाईन वापरणाऱ्यानां आपण हा मार्ग हा प्रश्न कायमचा धसास लावू असे आश्वासन काही महिन्यांपूर्वी सुपे येथील मेळाव्यात दिले होते. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तोंडावर चासकमान जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ही निविदा प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पाइपलाइनच्या कामकाजाचा समावेश असून त्याचा दुरुस्तीचा व सेवेचा कालावधी पाच वर्षांचा यामध्ये नमूद करण्यात आला आहे. 359.28 कोटींची ही योजना आहे.

दरम्यान जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी टेंडर निघाल्यानंतर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस ज्ञानेश्वर पोमणे यांनी हा निर्णय म्हणजे येथील शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धीचा नवा सूर्योदय आणणारा ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित दादांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत अगदी ठामपणे जिरायत हा शब्द आपल्याला पुसून टाकायचा आहे असे आश्वासन दिले होते आणि या आश्वासनाची पूर्ती करण्याच्या दृष्टीने त्यांनी अहोरात्र पाठपुरावा केला. हे काम केवळ अजित पवारच करू शकतात हे साऱ्यांनाच माहीत आहे, असे मत व्यक्त केले आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एकदा दिलेला शब्द हा पुर्ण करूनच दाखवतात.मध्यंतरी या बंद पाईप लाईन बाबत काही विरोधकांकडून निवडणुका डोळ्यासमोर समोर ठेवून काही अफवा पसरवण्यात आल्या. परंतु अजितदादांची काम करण्याची पद्धत ही सर्वसामान्य माणसाला माहीत आहे. दादांनी शब्द दिलेला आहे मी या भागाचा जिराईत हा शब्द पुसणार आहे आणी खऱ्या अर्थाने त्याची ही सुरुवात आहे. विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या आणि कितीही चुकीचा प्रचार केला, तरी आमचा हा सुपे परगणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कधीच विसरणार नाही आणि कसलंही अंतर पडू देणार नाही, असेही पोमणे यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!