पुण्यातील नवले पुलाच्या अपघातप्रकरणी अपडेट ; नवस फेडायला गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू


पुणे : पुण्याच्या नवले पुलावर गुरुवारी संध्याकाळी कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन ट्रकच्या मधोमध एक कार सापडल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात एका कुटुंबासह आठ जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले आहेत.यामध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचा कंटेनर वरचा ताबा सुटल्याने कंटेनर पुढे असलेल्या गाड्याना धडकला. या भीषण अपघातानंतर गाडीने पेट घेतला. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले. मृतांमध्ये एका अख्या कुटुंबाचा समावेश आहे. नवस फेडायला गेलेल्या या कुटुंबावर काळाने घाला घातला.कारमधील प्रवासी मयत स्वाती संतोष नवलकर, वय 37 वर्ष, शांता दत्तात्रय दाभाडे वय 54 वर्ष, दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे वय 58 वर्षे या एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यासोबत 3 वर्षींची त्यांच्या शेजारी राहणारी मुलगी मोक्षिता हेमकुमार रेड्डी होती. ही मुलीग आपल्या आईच्या मैत्रिणीसोबत फिरायला गेली होती. तिने देखील या अपघातात आपले प्राण गमावेल आहे.

नवलकर कुटुंबातील व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, स्वाती नवलकर यांच्या वडिलांना पक्षाघाताचा झटका आला होता. यामधून ते सुखरुप वाचावेत आणि चालू लागावेत यासाठी त्यांनी 5 गुरुवार केले होते. अपघात झाला तो शेवटचा पाचवा गुरुवार होता. त्या नारायणपुरवरुन दत्तांचे दर्शन घेऊन घरी परतत होते. त्याच दिवशी त्यांच्या मुलीचा देखील वाढदिवस होता. अशातच त्यांचा अपघाताचा झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!