ब्रेकिंग!लाल किल्याच्या स्फोटानंतर मुंबईच्या CSMT स्टेशनबाहेर संशयित बॅग, बॉम्ब शोधक घटनास्थळी दाखल

मुंबई : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असतानाच आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक संशयित बॅग आढळली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.या प्रकरणाची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून स्टेशन परिसरात तपास केला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या बाहेर एक संशयित बॅग आढळली आहे. जवळपास दोन तासांपासून ही बॅग तिथेच होती, अशी प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झालें आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित परिसर निर्मनुष्य केला आहे आणि तपासाला सुरुवात केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे अत्यंत वर्दळीचं रेल्वे स्टेशन आहे. इथे प्रचंड देशभरासह जगभरातून पर्यटक येत असतात. अतिशय संवेदनशील असा हा परिसर मानला जातो. विशेष म्हणजे याआधीदेखील सीएसएमटी स्थानकात दहशतवादी हल्ला झाला आहे. त्यामुळे सीएसएमटी रेल्वे स्टेशन परिसरात प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त असतो. तसेच कुठलीही संशयित वस्तू आढळल्यास तातडीने तपास केला जातो. आतादेखील एक लाल बॅग सीएसएटी स्थानकात सापडल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट जारी केला आहे.

संबंधित परिसरात संशयित बॅग आढळल्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झालं. या पथकाकडून आधी मेटल डिटेक्टरने तपासणी केली गेली. जवळपास दहा मिनिटे मेटल डिटेक्टरने तपासणी केली गेली. त्यानंतर बॅग उघडण्यात आली. या बॅगेत आधी कागदपत्रे आढळली. ती बाहेर काढण्यात आले. त्यानंतर कपडे निघाले. अधिकाऱ्यांकडून आणखी शोध सुरु आहे. बॅगेत नेमकं काय-काय आढळलं, याचा सविस्तर तपास केला जात आहे. तसेच संबंधित बॅग नेमकी कुणाची आहे, याचा देखील सखोल तपास केला जाणार आहे.