पिंपरी-चिंचवडमध्ये अंगावर काटा आणणारा अपघात! बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्…व्हिडिओ व्हायरल


पुणे : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढताना दिसत आहे. अशातच आता पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील बीआरटी लेनमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या बाईकस्वाराचा विचित्र अपघात झाला आहे.

भरधाव बाईकस्वाराचे डोके बीआरटी बस स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकले आहे. या अपघातात बाईकस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीआरटी लेनमध्ये नियमांचे उल्लंघन आणि अतिवेग हेच या अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

तसेच ही घटना शनिवारी दुपारी घडली. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील बीआरटी लेनमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या बाईकस्वाराचा हा विचित्र अपघात झाला आहे. या अपघात त्याचे डोके बी आर डी बस स्टँडच्या लोखंडी ग्रील मध्ये अडकले आहे, या घटनेनंतर परिसरात काही वेळ खळबळ उडाली होती.

दरम्यान, तरूण भरधाव वेगात जात असताना बाईकवरील नियंत्रण सुटल्याने बाईक थेट बीआरटी बस स्टँडच्या लोखंडी ग्रीलवर आदळली, आणि तरुणाचे डोके त्या ग्रीलमध्ये अडकले. या अपघातात बाईकस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बीआरटी लेनमधील नियमभंग आणि अतिवेगामुळे हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे.

वाकड भागातील बीआरटी मार्गावर एका युवकाने आपल्या दुचाकीवरून अतिवेगाने प्रवास करताना वाहनावरील नियंत्रण गमावलं. परिणामी त्याची बाईक थेट बीआरटी बस स्टँडच्या लोखंडी ग्रीलवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की, त्या युवकाचे डोके ग्रीलमध्ये अडकले. पाहणाऱ्यांच्या डोळ्यासमोरच हा प्रसंग घडला आणि काही वेळ परिसरात मोठी खळबळ उडाली.

अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिस तसेच अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने ग्रील कापून तरुणाला बाहेर काढले. जखमी तरुणाला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!