शिक्षकच निघाला हैवान! केलं नको ते कृत्य, मुलीला दुपारी एक्स्ट्रा क्लाससाठी बोलावलं अन्…

पिंपरी चिंचवड : याठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी शिक्षकच हैवान झाला असून शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनभंग केला आहे. क्लासेसमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एक्स्ट्रा क्लासेसच्या नावाखाली बोलावून मुलीचा विनभंग
केला.

याबाबत शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चव्हाण असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी शिक्षक चेतन चव्हाण याने 17 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रीणीला जादा क्लासेससाठी बोलावलं होतं. आरोपीने पीडित मुलीला बोलावलं आणि तिच्या मैत्रिणीला एक पेपर सोडविण्यासाठी देऊन वरच्या मजल्यावर पाठवलं.
नंतर ती काय करते हे पाहण्यासाठी आरोपी अल्पवयीन मुलीला लिफ्टमध्ये घेऊन गेला आणि तिचा विनयभंग केला. नंतर मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत बसली असता ऑफिस बंद करण्यासाठी खाली चल म्हणून तिच्या मागे लागला. नंतरही दम देऊन तिच्यासोबत अश्लील गोष्टी केल्या.

दरम्यान, पीडित मुलीने वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितलं. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी गुन्हा दाखल केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून याबाबत कारवाईची मागणी केली जात आहे.
सध्या राज्यात अशाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. घरात, शाळेत, क्लासेसे आणि कामाच्या ठिकाणी देखील महिलांना नको त्या प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. यामुळे कायदे कठोर करून शिक्षा देण्याची मागणी केली जात असून सध्या परिस्थिती भयंकर झाली आहे.