पुण्यातील बिझनेस मॅनच्या सुनेचा धक्कादायक कारनामा ; सासू-सासर्यांना झोपेच्या गोळ्या द्यायची अन प्रियकरासोबत…..

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी कुटुंबातील सुनेचा धक्कादायक कारनामा उघडकीस आला आहे.सून आपल्या सासू -सासऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन प्रियकरासोबत दिवसा ढवळ्या घरात संबंध ठेवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.कुटुंबियांनी सुप्रसिद्ध खासगी गुप्तहेर डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तिची तक्रार दाखल केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब शहरातील नामांकित व्यापारी आहेत. वृद्ध दांपत्य यांना दोन मुलं आणि दोन सुना असे परिवार आहे. काही महिन्यांपासून वृद्ध दांपत्याला वारंवार झोपेचा त्रास जाणवत होता. त्यांनी याबाबत फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.या तपासणीत वृद्ध दांप्त्याच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांचे प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं. डॉक्टरांनी मोठ्या सुनेची वैद्यकीय तपासणी केली. तिच्याही रिपोर्टमध्ये गोळ्यांचे अतिप्रमाण झाल्याचं आढळून आलं. मात्र, छोट्या सुनेच्या रिपोर्टमध्ये काहीही आढळलं नाही. कुटुंबियांचा संशय लहान सुनेवर गेला. त्यानंतर तिची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान प्रिया काकडे यांनी सूनेशी मैत्री करून तिच्याकडून पुरावे गोळा केले. काही दिवसांतच संपूर्ण प्रकरण समोर आलं. लहान सून वृद्ध दांप्त्याच्या नाष्त्यामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळायची. ही चूक अखेर लहान सुनेन कबूल केली.
