इंदापूरमध्ये शंकररावजी पाटील साखर कारखान्यात सहकार टिकवण्यासाठी देशातील पहिलाच उपक्रम, गळीत हंगामाचा शुभारंभ…


इंदापूर : इंदापूर तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा असलेला कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टीलरी पॉवर प्रा. लि युनिट नंबर ११ महात्मा फुलेनगर (बिजवडी) या कारखान्याचा 36 व्या हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभ संपन्न झाला.

यावेळी माजी मंत्री राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील तसेच ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुरावजी बोत्रेपाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, सध्या राज्यात सगळीकडे उसाचा गळीत हंगाम सुरू होत आहे. आपल्या कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने देखील सर्व पूर्व तयारी केली आहे. कारखाना गाळपासाठी कारखाना सज्ज आहे.

आपला हा कारखाना परिसरातील अर्थकारणातील एक प्रमुख घटक आहे. अनेकांचे जीवनमान या कारखान्यावर अवलंबून आहे. यावर्षी आपण सहकारी संस्था टिकवून त्यामध्ये खाजगी गुंतवणूक आणली आहे. हा कारखाना आपला आहे.

सहकार क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणूक (Collaboration | सहयोग ), या नवीन तत्त्वामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाचे वेळेवर गाळप व शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळतील अशी ग्वाही मी सर्वांना देतो. असेही ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!