पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल ; बायको आणि मुलीचा त्रास असह्य…

पुणे : पुण्यातील पर्वती परिसरात एका वरिष्ठ कर्मचाऱ्यांने बायको आणि मुलीच्या त्रासाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या बहिणीला व्हिडीओ कॉल केला होता. आपल्याला मायलेकीचा त्रास असल्याचं बहिणीला सांगितलं. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी मयताच्या पत्नीसह दोन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारी ५७ वर्षीय व्यक्ती मुंबईतील महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींसोबत कौटुंबिक कारणावरून वारंवार वाद होत होते. या सततच्या वादाला कंटाळून त्यांनी अखेर आत्महत्या केली. मात्र आत्महत्या करण्याआधी त्यांने आपल्या बहिणीला सांगितले की, पत्नी आणि मुलींसोबत होणाऱ्या रोजच्या भांडणांमुळे आणि सततच्या त्रासामुळे मी आता आत्महत्या करत आहे.हे बोलून त्यांनी गळफास घेत आपलं जीवन संपवलं.
या घटनेनंतर मृताच्या बहिणीने पोलिसांकडे धाव घेतली. बहिणीच्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्यांची पत्नी आणि दोन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्वती पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
