पुण्यात टोळीयुद्धाचा भडका ; जेलमध्येच फील्डिंग, कोमकर, काळेनंतर आता गायकवाड? आणखीन एक खून….

पुणे: गेल्या काही दिवसापासून पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडाला आहे.माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येतील आरोपीच्या भावाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. मुख्य आरोपी तुरुंगात असतानाही आता बाहेर त्याने फिल्डिंग लावून खुनाची सुपारी दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.कोमकर, काळेनंतर आता गायकवाड या व्यक्तीच्या कुणाशी सुपारी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यात टोळीयुद्धाचा भडका उडणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आयुष कोमकरच्या खुनानंतर आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आणि त्याचे अनेक साथीदार मागील दोन महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. तरीही, वनराज आंदेकरच्या खुनातील आरोपीच्या भावाचा खून झाल्याने शहरात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका उडाला आहे. यामुळे, मुख्य आरोपी तुरुंगात असतानाही बाहेर ‘फिल्डिंग’ लावून खुनाची सुपारी दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे आयुष कोमकरची हत्या करण्यापूर्वी आंदेकर टोळीने आंबेगाव परिसरात वनराज खून प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडच्या घराची रेकी केली होती. त्याचे कुटुंबीय आंदेकर टोळीच्या टार्गेटवर होते. याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. आता पुन्हा एकदा सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबामधील कुणाला तरी टार्गेट केलं जाऊ शकतं, असा अंदाज पोलीसांकडून वर्तवला जात आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींच्या कुटुंबातील दोन व्यक्तींचे (आयुष कोमकर आणि गणेश काळे) खून झाले आहेत. हे खून योगायोग नसून, सूडबुद्धीने करण्यात आले आहेत, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे येत्या काळात टोळीयुद्ध अधिक तीव्र होण्याची आणि आणखी खून होण्याची भीती व्यक्त होत आहे. या सर्व घटनांमुळे गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांना सतर्क झाल्या आहेत.
