गुंड निलेश घायवळचा गेम ओव्हर ; लंडनमधील लोकेशन अखेर सापडलं, युके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती; अटकेसाठी हालचालींना वेग


पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. घायवळ हा लंडनमध्ये असल्याच युके हायकमिशनकडून पुणे पोलिसांना सांगण्यात आले आहे. ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंतचा निलेश घायवळचा युकेमधील व्हिसा आहे. मुलगा लंडनमध्ये शिकत असल्याने निलेश घायवळ लंडनमध्ये असल्याची माहिती युके हायकमिशनकडून पुणे पोलिसांना देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फरार झाल्यापासून पुणे पोलीस निलेश घायवळच्या शोधात होते. पोलिसांनी युनायटेड किंग्डमच्या हाय कमिशनला पत्र लिहून निलेश घायवळचा शोध घेऊन ताब्यात घेण्याची मागणी केली होती. घायवळने चुकीच्या प्रक्रियेतून पासपोर्ट मिळवणल्याचा गंभीर आरोप पोलिसांनी केला आहे, त्याच्यावर पुण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख हि पत्रात करण्यात आला आहे.त्यामुळे घायवळ कुठे आहे हे शोधून तात्काळ माहिती द्यावी अशी विनंती पुणे पोलिसांनी हाय कमिशनकडे केली होती. त्यानुसार आता निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. निलेश घायवळ हा लंडनमध्येच आहे. युके हाय कमिशनने पुणे पोलिसांना उत्तर दिले आहे. युके हाय कमिशनने निलेश घायवळबाबत तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांना कळवले असल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे युकेमध्ये निलेश घायवळ कुठे लपून बसला आहे याची देखील माहिती लवकरच समोर येणार आहे.दरम्यान आता निलेश घायवळला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

निलेश घायवळ हा पुण्यातल्या कोथरूड परिसरातील गुंड आहे. निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी १७ ते १८ सप्टेंबर दरम्यान कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीवर गोळीबार केला. त्यानंतर त्याच परिसरात एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार केले होते. या प्रकरणात निलेश घायवळसह त्याच्या टोळीविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल होताच निलेश घायवळ गायब झाला. अखेर लंडनमध्ये त्याच्या मुसक्या आवळल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!