स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा! अमित शहांच्या कार्यकर्त्यांना सूचना…

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भाजपच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेशी आपल्या भाषणात अमित शाह यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. महाराष्ट्र भाजपसाठी आजचा दिवस शुभ आहे.

हे फक्त कार्यालय नसून भाजपसाठी एक मंदिर आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा असे आवाहन अमित शहा यांनी यावेळी केले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आपल्या भाषणात बोलताना अमित शहा म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या स्मृतींना अभिवादन करतो. सर्व भाजप कार्यकर्त्यांसाठी आज शुभ दिवस आहे. महाराष्ट्र भाजप आपल्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन करून इतिहासात एक नवीन सुरूवात करतोय.

पक्षाची स्थापना झाल्यापासून छोटे मोठ्या कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांना माहिती आहे ती कार्यालय हे आपले मंदिर आहे. पक्षाचे सिद्धांत संरक्षित व संवर्धन हे कार्यालयात होतात.
या कार्यालयात कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होते, बाकीच्या पक्षांसाठी कार्यालय हे फक्त काम करण्याचे ऑफिस असेल, मात्र भाजपसाठी कार्यालय म्हणजे मंदिर होय. आम्ही नेहमीच सिद्धांताच्या आधारे निती घडवली. भारत व भारतीय लोकांच्या हितासाठी कठोर संघर्ष केलाय हे तिन्ही उद्देश ज्या ठिकाणी पूर्ती होते, ते ठिकाण आहे भाजपचे कार्यालय.
मी सर्व माजी अध्यक्ष, देवेंद्र फडणवीस व सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. आता भाजप कुठल्या कुबड्यांचा आधार न घेता चालत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजप हा एक मजबूत स्वाक्षरी म्हणून दिसत आहे.
इमारत पाहून मी मला आनंद झाला, 55 हजार चौरस फुटाचे हे कार्यालय आहे. लायब्ररी, कॉन्फरन्स रूम, प्रदेशाध्यक्ष सोबत मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आहे. हे कार्यालय मुख्यमंत्र्यांना आठवण करून देईल की येथूनच निवडून जायचे आहे. मला आनंद आहे, महाराष्ट्र भाजप प्रदेशने आपल्या परंपरेला लक्षात ठेवले आहे.
जनसंघानंतर भाजपचा निर्माण झाले, तेव्हा अटलजी बोलले होते, कमळ खिलेगा, तेव्हा आपण पाहिले अटलजी पंतप्रधान झाले. त्यानंतर ११ वर्षे मोदी जी पंतप्रधान आहेत. देशाचे पंतप्रधान हे भाजपचे नेता झाले हे आपल्या साठी गौरवाची बाब आहे.