पुण्याच्या मॉडर्न कॉलेजात जातीवाद? लंडनमध्ये नोकरी गमावलेल्या प्रेम बिऱ्हाडेचे खळबळजनक आरोप…

पुणे : पुण्यातील नामांकित कॉलेजच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाला ब्रिटनमधील कंपनीतील नोकरी गमवावी लागली असल्याची माहिती समोर आली होती. आता प्रेम बिराडे या विद्यार्थ्याने मॉडर्न कॉलेजवर जातीवादाचे गंभीर आरोप केले आहेत. बिराडे यांच्या म्हणण्यानुसार, कॉलेजने त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना लंडनमध्ये मिळालेली सुमारे ४० लाख रुपयांची नोकरी गमावावी लागली. मी दलित असल्यामुळेच कॉलेजने असे केले, असा खळबळजनक आरोप त्याने केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रेम बिराडे हा तरुण ब्रिटनमधील कंपनीत आहे प्रेम ने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये प्रेमने २०२०-२४ या कालावधीत बीबीएचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयाच्या प्रशासनाने जातीय भेदभाव करून व्हेरिफिकेशन केले नाही,’ असा आरोप त्याने केला आहे.या आरोपांवर मॉडर्न कॉलेजने मात्र जातीवादाचा इन्कार केला आहे. कॉलेजच्या म्हणण्यानुसार, संबंधित नोकरीसाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर पडताळणी प्रक्रियेमुळे विलंब झाला. मात्र, याआधी याच कॉलेजने प्रेम बिराडे यांना लंडनमध्ये शिक्षणासाठी शिफारसपत्र दिले होते, ज्यामध्ये त्यांच्या चांगल्या वर्तनाचे कौतुक केले होते. आता नोकरीच्या वेळी कॉलेज विद्यार्थ्याच्या वर्तणुकीबाबत तक्रारींचे कारण देत आहे, ज्यामुळे कॉलेजच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान या प्रकरणी आता वंचित आघाडीने निवेदिता एकबोटे यांच्या नेतृत्वाखालील मॉडर्न कॉलेजविरोधात आंदोलन केले आहे. यामध्ये कॉलेज प्रशासनावर मनुवादी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मॉडर्न कॉलेज हे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीद्वारे चालवले जाते, ज्याचे अध्यक्ष गजानन एकबोटे आहेत आणि निवेदिता एकबोटे त्यांच्या कन्या आहेत. प्राचार्य निवेदिता एकबोटे यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याची माहिती समोर आली आहे.

