उरुळीतील टँकर दुकानात घुसून झालेल्या नुकसान प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल! अपघातात दुकान, चारचाकी व दुचाकी चक्काचूर…

उरुळी कांचन : टँकर दुकानात घुसवून नुकसीन कारणीभूत ठरुन अपघात केल्याप्रकरणी टॅंकर वाहन चालकावर उरुळीकांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळीकांचन हद्दीत टॅंकरचा ताबा सुटून टँकर दुकानात घुसून दुकान, टँकर, व चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी रात्री उशिरा संजय तुळशीराम टिळेकर( वय ६३ वर्षे, रा.टिळेकरमळा,उरूळीकांचन,ता.हवेली,जि.पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आहे.

याप्रकणी टॅंकर चालक लक्ष्मण प्रसाद रामअतवारी (रा.पूरनपुर,पो.नेकेनिया,ता.तुलसीपूर,जि.बलरामपुर,राज्य उत्तरप्रदेश )असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टॅंकर चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, हा अपघात रविवारी (ता.५) पहाटे ०५.२० वाजता. टॅंकर नं एम.एच.43 सी.के.8903 वरील चालक लक्ष्मणप्रसाद रामअतवारी यांनी त्याच्या ताब्यातील टॅंकर पुणे बाजुकडुन सोलापुर बाजुकडे चालवीत घेवुन जात असताना तो हयगयीने,अविचाराने,लोकांचे जिवीतास धोका होईलअशा रितीने व रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवुन न्यु अमर टायर दुकानाचे बाहेरील उभी असलेली मारूती आल्टो कारला धडक देवुन टायर दुकानामध्ये षिरून टायर दुकानातील मारूती ८०० कार,यमहा मोटार सायकल, तसेच टायर दुकान तसेच दुकानातील साहित्याचे नुकसान झाले आहे.
याप्रकणी टॅंकर चालकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
