नवरात्रोत्सवात मुंबई हादरली! गॅस सिलेंडर पाईप लीक झाल्याने मोठा स्फोट ; 7 जण गंभीर जखमी


पुणे : ऐन नवरात्रीत मुंबई उपनगरातील कांदिवली (पूर्व) येथील मिलिटरी रोडवरील राम किसन मेस्त्री चाळीत आज गॅस सिलेंडरची पाईप लीक झाल्याने मोठा स्फोट झाला आहे. हा स्फ़ोट इतका भीषण होता की,या आगीत सात जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कांदिवली येथील मिलिट्री रोडवरील रामकिसन मेस्त्री चाळीत घरातील वीजजोडणी, एलपीजी गॅस सिलिंडर लिकेज् झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीत सात जण गंभीर भाजले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि समता नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.दरम्यान स्फोटाची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ही आग एक मजली असलेल्या गाळ्याला लागली. घर आणि दुकान असलेल्या गाळ्याला आग लागल्याने खळबळ उडाली होती.

या आगीत जखमी झालेल्या सहा जणांची प्रक़ृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर ईएसआयसी रुग्णालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!