जनधन खातेधारकांसाठी अलर्ट, ३० सप्टेंबरपर्यंत ‘हे’ काम पूर्ण करा, अन्यथा खाते होईल बंद…

पुणे : तुमच्या जनधन खात्याला १० वर्षे पूर्ण झाल्यावर एक महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे.. जर हे काम केले नाही, तर तुमचे खाते गोठवले जाऊ शकते. याचा अर्थ असा की खात्यातून पैसे काढणे, जमा करणे किंवा सरकारी सबसिडी मिळवणे, सर्व काही थांबू शकते.

त्यामुळे तुमचे जनधन खाते सुरक्षित आणि सक्रिय राहावे, तसेच सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला मिळू शकेल यासाठी ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी री-केवायसी करणे खूप आवश्यक आहे.
केंद्रातील मोदी सरकार ने आजपर्यंत बँकिंग क्षेत्रानिगडित अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्यांना सरकारी योजनाचा लाभ घेता यावा म्हणून सरकारकडून २०१४ मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना सुरु करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेअंतर्गत ५५.९ कोटी लोकांची खाती उघडली गेली आहेत. यावर्षी या योजनेला १० वर्ष पूर्ण झाल्यामुळे या खात्याचे री केवयसी करणे अनिवार्य झाले आहे.

वित्तीय संस्था जसे की बँक, आपल्या ग्राहकांची ओळख पडताळणीसाठी KYC चा वापर करतात आणि KYC करणे सगळ्या ग्राहकांlना अनिवार्य असते. आता Re-KYC म्हणजे आपले उपलब्ध असणारे जुने KYC अपडेट करवून घेणे. जसे कि आपले बँक खात्यावरचे नाव, घराचा पत्ता, फोटो आणि मोबाईल नंबर

सरकारने प्रत्येक ग्रामपंचायतीत री-केवायसी शिबीर सुरु केले आहे आणि याची प्रक्रिया देखील सोपी ठेवली आहे. केवळ आधार कार्ड आणि पत्याचा पुरावा या दोनच गोष्टी या प्रक्रिये साठी लागणार आहेत.
आतापर्यंतच्या सगळ्या खात्यात सुमारे १० कोटी खाती अशी आहेत ज्यांना उघडून १० वर्षे पूर्ण होता आहेत. त्यामुळे या खात्यांची जुनी माहिती अपडेट करून घेण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर खाते योग्य व्यक्ती च्या नावावर आहे का? त्याचा काही गैरवापर होतोय का? या गोष्टी तपासण्यासाठी देखील री-केवायसी करणे महत्वाचे आहे.