खरेदीदारांना धक्का ; सोन्याच्या दराने गाठला उच्चांक, काय आहेत आजचे 24 कॅरेटचे भाव?


पुणे: गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा देशात सोन्याच्या दरांनी आज मोठी उसळी घेतली आहे. 21 सप्टेंबर रोजी, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,12,150 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,02,800 रुपये इतका नोंदवला गेला. तसेच, 18 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर 8,411 रुपये आहे. या वाढीमुळे खरेदीदारांना मोठा धक्का बसला असून, सोन्याचा भाव आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.

जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता, महागाई वाढण्याची शक्यता आणि भू-राजकीय तणाव यांसारख्या कारणांमुळे सोन्याची मागणी वाढली आहे.मात्र, सामान्य ग्राहकांना सण-उत्सवाच्या काळात दागिने खरेदी करणे आता अधिक महाग झाले आहे.दरम्यान 20 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,11,340 रुपये होता, तर 19 सप्टेंबर रोजी तो 1,11,160 रुपये होता.त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही वाढ झाली असून, आज चांदीचा दर प्रति किलोग्रॅम 1,35,000 रुपये आहे. काल हा दर 1,33,100 रुपये होता, याचा अर्थ एका दिवसात चांदी 1,900 रुपयांनी महाग झाली आहे.

दरम्यान सोन्याच्या दरांतील ही वाढ केवळ राष्ट्रीय स्तरावरच नाही, तर प्रमुख शहरांमध्येही दिसून येत आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,12,300 रुपये, नाशिकमध्ये 1,12,180 रुपये, आणि सुरतमध्ये 1,12,150 रुपये इतका आहे. या स्थानिक दरांमधील फरक वाहतूक खर्च, स्थानिक कर आणि मागणी यांसारख्या विविध घटकांमुळे दिसून येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!