पंतप्रधान मोदी आज सायंकाळी देशाला संबोधित करणार ;’ या’ मुद्द्यावर होणार मोठी घोषणा?

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे अचानकपणे देशाला संबोधित करणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र ते कोणत्या विषयावर देशाला संबोधन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे. तसेच त्यांच्या भाषणाचा विषय काय असेल याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी याआधी देखील अचानकपणे देशाला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्यामुळे देशवासियांचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले आहे. सोमवार, 22 सप्टेंबरपासून देशात जीएसटी 2.0 नुसार नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे पीएम मोदी हे जीएसटी दरांमधील बदल आणि “व्होकल फॉर लोकल” मोहिमेवर भाष्य करतील अशी अपेक्षा आहे. तथापि, ते अमेरिकेतील व्यापार युद्ध आणि एच1बी व्हिसाशी संबंधित वादावर चर्चा करतील की नाही याबद्दल कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाकडे सर्वांचे लक्ष लागल असताना दिवाळीपूर्वी सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच अनेक वस्तू स्वस्त होणार आहे त्यामुळे पंतप्रधान या निर्णयाची सविस्तर माहिती देतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
