बँकेत मोठा फ्रॉड! मुंबईत बँक कर्मचाऱ्यांनेच तब्बल 16 कोटींवर मारला डल्ला, ईडीकडून ठोकल्या बेड्या..

पुणे: मुंबईतील एका बँक कर्मचाऱ्यांने १२७ जणांच्या बँक खात्यामधून तब्बल १६ कोटी रूपयावर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अहमदाबाद जंक्शनवर एका धावत्या ट्रेनमध्ये ईडीने सापळा रचत आरोपी हितेश सिंगला याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हितेश हा बँक ऑप इंडियाच्या वांद्रे येथील टर्नर रोडवरील शाखेमध्ये कार्यकरत होता. सिंगला याने शिताफिने १२७ बँक खातेदारांच्या पैसावर डल्ला मारला. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, अल्पवयीन, मृत व्यक्ती आणि निष्क्रिय किंवा निष्क्रिय खात्यांचा समावेश आहे. त्याने खातेदारांच्या परवानगीशिवाय तब्बल 16 कोटी लंपास केले. या प्रकरणात आणखीन एका बँक अधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.ईडीने यामध्ये सहभागी असलेल्या आणखी एका बँक अधिकाऱ्यालाही बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने सिंगला याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बँकेने त्याचे निलंबन केले होते. सिंगला याच्यावर ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. सिंगला गेल्या काही दिवसांपासून फरार होता. ईडीने त्याचा शोध सुरू केला होता. अखेर त्यांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या.
आरोपी सिंग याने मुदत ठेवी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाती, बचत बँक (एसबी) आणि चालू खात्यामधून सिंगला याने थोडे थोडे असे १६ कोटी रूपयांवर डल्ला मारला. सिंगला याने १२७ खातेदारांचे पैसे चोरून आपल्या एसबीआयमधील खात्यात ट्रान्सफर केले होते. ईडीकडून याबाबतचा तपास केला जात आहे.
