पुणे पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक ‘; 27 बँक खाती अन कोट्यवधीचीं मालमत्ता जप्त ; आंदेकर टोळीला दणका..

पुणे : पुण्यातील नानापेठेत झालेल्या टोळीयुद्ध आणि कौटुंबिक वादातून उगम पावलेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपींची एकूण 27 बँक खाती फ्रिज करण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये एकूण 50,66,199 रुपये गोठवण्यात आले आहेत. त्यामुळे आंदेकर टोळीला चांगलाच दणका बसला आहे.

याबाबत मिळालेला माहितीनुसार, आयुष कोमकर खून प्रकरणी टोळीप्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकरच्या कुटुंबातील नऊ सदस्यांसह एकूण 15 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 12 जण पोलिसांच्या कोठडीत आहे. आता या प्रकरणातील आंदेकर टोळीचा आर्थिक कणा मोडण्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं आहे.पोलिसांनी आरोपींची एकूण 27 बँक खाती फ्रिज करण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये एकूण 50,66,199 रुपये गोठवण्यात आले आहेत. जप्त केलेली ही रक्कम आरोपींच्या घरझडतीतून मिळालेल्या मालमत्तेव्यतिरिक्त आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांनी आरोपींच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये टोळीतील सर्व सदस्यांचा समावेश आहे.
दरम्यान वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली हिला चौकशीसाठी ताब्यात घेणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी 13 जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोमकर खून प्रकरणात आंदेकरला पोलिसांनी अटक केली असून, तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
