अजित पवारांच्या राष्ट्रवादीच ठरलं!मुंबई महापालिका वगळता इतर ठिकाणी स्वबळावर लढणार


पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिका निवडणूक वगळता राष्ट्रवादी पक्षाचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय प्रफुल पटेल यांनी जाहीर केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नाशिकमध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा घेऊन पक्षात जान फुंकली. भारतीय जनता पक्षानेही मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून ‘मुंबई आपलीच’ असा नारा दिला. पाठोपाठ अजित पवार यांच्या पक्षाचेही नागपुरात शिबिर सुरू आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने स्वबळावर लढण्याची घोषणा केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येच खऱ्या अर्थाने पक्षवाढ होते, म्हणून मुंबई वगळता इतर ठिकाणी स्वबळावर लढणार
पक्ष वाढवायचा म्हटल्यावर निवडणुकांत अनेकांना संधी द्यावी लागते. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येच खऱ्या अर्थाने पक्षवाढ होत असते. त्यामुळे मुंबई वगळता आमचा पक्षाने उर्वरित महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. असे पटेल यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!