मोठी बातमी! बडतर्फ वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरचे आई-वडील फरार ; काय आहे प्रकरण?


पुणे : वादग्रस्त आणि बडतर्फ झालेली आयएएस अधिकारी पूजा खेडकर नावाच्या तरुणीच्या अपहरणाचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणी तिचे आई-वडील आरोपी असून ट्रक क्लिनरच्या अपहरणाशी संबंधित गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर ते दोघेही फरार झाले आहेत. रबाळे पोलिसांनी त्यांच्या शोधार्थ पथके तैनात केली आहेत. पोलिसांचा शोधकार्य सुरू असताना या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर आणि तिचे वडील दिलीप खेडकर सध्या फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. मनोरमा खेडकर यांनी पोलीस ठाण्यात हजर होण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्या देखील गायब झाल्या आहेत. या घटनेमुळे स्थानिक परिसरात तीव्र चिंता निर्माण झाली आहे. पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.पोलिसांनी खेडकरांच्या बंगल्यात तब्बल दोन तास तपासणी केली. तपासादरम्यान पूजा खेडकरचा मोबाईल जप्त करण्यात आला. घरात उपस्थित केअरटेकरला ताब्यात घेण्यात आलं. दोन जेवणाचे डबे आढळले, जे कुणाच्या उपस्थितीचा पुरावा मानला जात आहे.

दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अपहरण, अरेरावी आणि सरकारी कामात अडथळा अशा अनेक कलमांअंतर्गत गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. लवकरच या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!