शिवचरित्रकार हरपला! ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहंदळे यांचं निधन..


पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यात बुधवारी सायंकाळी निधन झालं. त्यांनी शिवकालीन इतिहासावर विपुल संशोधन केले. ‘श्री राजा शिवछत्रपती’ आणि ‘Shivaji His Life and Times’ यांसारखी त्यांची पुस्तकं वाचकांशी पर्वणी ठरली. आज त्यांचे पार्थिव भारत इतिहास संशोधक मंडळात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

गेली पन्नास वर्षे गजानन मेहदळे यांनी इतिहासाच्या संशोधन कार्याला वाहून घेतलं होतं. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते.त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्लिश मध्ये खूप मोठी ग्रंथ देखील लिहिले आहेत.श्री राजा शिवछत्रपती खंड १ आणि २, Shivaji His Life and Times, Tipu as He Really Was, शिवछत्रपतींचे आरमार, आदिलशाही फर्माने, इस्लामची ओळख अशी महत्वाची पुस्तकं त्यांनी लिहली. त्यांच्या संशोधन साकार झालेली पुस्तकं आणि शिव ही पुस्तकं वाचकांच्या खास पसंतीस पडली. शिवप्रेमींसाठी ते पर्वणी ठरली आहेत.

वयाच्या २४व्या वर्षी तरुण भारतचे पत्रकार म्हणून त्यांना बांग्लादेशात पाठवण्यात आले होते. युद्ध सुरू होण्याच्या सात-आठ महिने आधीच गजाभाऊ तेथे पोहोचले होते. त्यावेळी प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले नसले, तरी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती कारण बांगलादेश मुक्ती वाहिनीने क्रांतीकार्याला सुरुवात केली होती.अशावेळी गजाभाऊंनी गंभीर स्थिती असतानाही बांगलादेशच्या वेगवेगळ्या सीमांमधून आत प्रवेश केला. तिथली युद्धपूर्वस्थिती अनुभवली. अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. पाकिस्तानी सैन्याविरुद्ध बांगलादेशमध्ये असलेला रोष यावर त्यांनी वृ्त्तांकन केले. त्यावर लिहिलेले लेख गजाभाऊ तार करून तरुण भारतला पाठवित असत. यानंतर प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले तेव्हा देखील गजाभाऊ बांग्लादेशातच होते. बांग्लादेश मुक्ती वाहिनीच्या एका गटाबरोबर गजाभाऊ युद्धक्षेत्रात काही काळ वावरले. तिथे तळ ठोकून असलेल्या अनेक भारतीय लष्करी अधिकाऱ्यांशी त्यांचा थेट संवाद झाला. सध्या ते इस्लामची ओळख आणि औरंगजेब या विषयावर संशोधन आणि लिखाण करत होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!