मोठी बातमी!कुणबी प्रमाणपत्रासाठी एक- दोन नव्हे 16 कागदपत्रे.. 3 कागदपत्र मिळणं कठीणचं…

पुणे: मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं.शेवटी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालंय. तसा थेट जीआरच सरकारने काढला. यासोबतच हैद्राबाद गॅझेटही मान्य करण्यात आल आहे. सरकारने काढलेल्या जीआरनंतर मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू झालं आहे. मात्र आता कुणबी प्रमाणपत्रासाठी एक दोन नव्हे 16 कागदपत्रे तपासली जातात, या कागदपत्रांमधील 8,9,10 नंबरची कागदपत्र मिळणं कठीण आहे.

कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे-
-वडिलांची शालेय शिक्षणाची टीसी

-शाळा सोडल्याचा दाखला

-आजोबांची टीसी
-आधार वडील
-वंशावळ 1
-खासरा
-बेनेफिरी आधार
-खासरा 3
-खासरा 1
-खासरा 2
-अॅफिडिनिट
-34
– 33
-वंशावळ जुळवणी समिती अहवाल
-गावपातळीवरील स्थानिक समिती अहवाल
-गावपातळीवरी स्थानिक समिती अहवाल
या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सध्या अनेक गावांमध्ये वंशावळ समिती अहवाल तयार करत आहे. यासोबतच वंशावळ जुळवण्याचे काम सुरू आहे. मराठवाड्यातील अनेक भाागांमध्ये कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू झाले आहे. दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाल्याने ओबीसींवर अन्याय झाल्याचे सांगून यासंदर्भात कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. आता मराठा आरक्षण कोर्टात टिकणार का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.