मुख्यमंत्र्यांवर अजित पवारांचा प्रभाव ! शासकीय निवासस्थानावरील अतिखर्चिक पाहुनचार खर्चांवर लावली कात्री…!

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्षा तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सागर बंगला हा राहण्यासाठी देण्यात आला आहे. त्यांच्या या बंगल्यावर भेटीगाठी साठी मोठ्या प्रमाणात मान्यवर आणि नागरिक येत असतात. या ठिकाणी त्यांची चांगली बडदास्त ठेवली जाते. मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानावरील अतिखर्चिक पाहुणचाराची चर्चा राज्यात सूरु आहे.


दरम्यान , अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी यावरून सत्ताधारी पक्षाला टोकले देखील होते. वर्षा बंगल्यावरील खाणपानाचं बिल 2 कोटी 38 लाख इतके असल्याची माहिती देत, चहामध्ये सोन्याच पाणी घातलं होत का? असा सवाल उपस्थित केला होता. यानंतर, आता शिंदे-फडणवीस सरकारने या अवाढव्य पाहुणचार खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारचा हा निर्णय ‘अजित पवारांच्या बोलण्याचा परिणाम’ असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ व उपमुख्यमंत्री यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी येणाऱ्या अतिथींच्या खानपान सेवांसाठी पुरवठादार निश्चित करण्यात आला आहे. यामुळे आता या दोन्ही निवासस्थानवरील खर्च आटोक्यात येणार आहे. हा खर्च अंदाजे 3.50 कोटी व 1.50 कोटी असणार आहे.
शासकीय करारानुसार पदार्थांचे दर खालीलप्रमाणे :
1) मसाला चहासाठी 14 रुपये
2) मसाला दुधासाठी 15 रुपये
3) शाकाहारी बुफेसाठी (साधारण) 160 रुपये
4) शाकाहारी बुफेसाठी (विशेष) 325 रुपये
5) मांसाहारी बुफेसाठी 175 रुपये