बीड हादरलं ; ओबीसी आरक्षण आणि मुलीच्या नोकरीच्या चिंतेतून बापाचा बळी, मृत्यूनंतर मुलीची आर्त हाक, माझी जबाबदारी कोण घेणार?

बीड : मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्यासाठी काढलेल्या जीआर नंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. अशातच आता ओबीसी बांधवांकडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. ओबीसी आरक्षण आणि मुलीच्या नोकरीच्या चिंतेतून बीडमध्ये दुसरा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहेत.

बीड जिल्ह्यातील गोरक्ष नारायण देवडकर यांनी ओबीसी आरक्षण आणि मुलीच्या नोकरीच्या चिंतेतून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती, नैराश्येतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. पूर्वी मराठा आंदोलकांच्या आत्महत्या आणि आता ओबीसी आत्महत्यांमुळे समाजमन हेलावले आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर भरतीची तयारी करणाऱ्या मुलीने आता माझी जबाबदारी कोण घेणार? माझे वडील तर गेले आहेत अशी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या या आर्त हाकेने अनेकांच्या काळजात चिर्रर झालं. सरकारने तत्काळ दखल घेतली पाहिजे अशी मागणी केली आहे. देवडकर यांच्या तीन मुलींचे लग्न झाले आहे. तर दोन मुली या पोलीस भरतीची तयारी करत आहेत. पती-पत्नी मोलमजूरी करुन संसाराचा गाडा ओढत होते. देवडकर यांच्या आत्महत्येमुळं कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
