पुणे झेडपीसाठी मैदान’ खुले ‘; अध्यक्षपदांसाठी नवीन नेतृत्वाला मिळणार संधी…

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने शुक्रवारी राज्यातील 34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षणाची यादी जाहीर केली आहे.यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि पंचायत समितीचे सभापतीपद हे केवळ अडीच वर्षांसाठीच राहणार आहे. यामध्ये नवीन नेतृत्वाला संधी मिळणार आहे.

महिला आरक्षणामुळे अनेक जिल्ह्यात आता नवीन नेतृत्वाला संधी मिळणार आहे. ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या यादीनुसार
पुणे, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ; तसेच नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग खुला ठेवण्यात आला आहे.
त्यात ठाणे, सांगली, कोल्हापूर, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत सर्वसाधारण (महिला) आरक्षण लागू करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, पंचायत समित्यांच्या सभापतिपदासाठी आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि पंचायत समितीचे सभापतिपदाचे आरक्षण हे अडीच वर्षांसाठी कायम राहणार आहे. त्यानंतर पुन्हा आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे लवकरच आता राजकीय धुरळा उडणार आहे.
