पुण्यातील ससून रुग्णालयात ‘या’ पदांसाठी भरती ; एकट्या पुणे जिल्ह्यातूनच….


पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत होता. तसेच रुग्णालय परिसरातील स्वच्छतेवरही परिणाम होत होता. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने ससूनमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ३५४ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. या पदांसाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी होती. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ३० हजारहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, या भरतीसाठी एकट्या पुणे जिल्ह्यातून तब्बल 9950 अर्ज दाखल झाले आहेत.

ससून रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ३५४ पदांसाठी २६ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. या पदभरतीमुळे ससून रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचा प्रश्न सुटणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.या भरतीमध्ये कक्षसेवक १६८, आया ३८, सेवक ३६, पहारेकरी २३, शिपाई २, क्ष-किरण सेवक १५, हमाल १३, रुग्णपटवाहक १०, सहायक स्वयंपाकी ९, नाभिक ८, स्वयंपाकी सेवक ८, प्रयोगशाळा सेवक ८, बटलर ४, दवाखाना सेवक ४, माळी ३, प्रयोगशाळा परिचर १. भांडार सेवक १, गॅस प्रकल्प चालक १ या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.दरम्यान अर्ज पडताळणीनंतर २६ हजार १०१ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले. ‘आयबीपीएस’ कंपनीतर्फे या भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे

या जिल्ह्यांमधून सर्वाधिक अर्ज

पुणे- ९९५०
नांदेड- १६९४
छत्रपती संभाजीनगर- १८९६
अमरावती- १२३६
लातूर- ११७०
अहिल्यानगर- १०५१

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!