मोठी बातमी! सी. पी. राधाकृष्णनं यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ, पीएम मोदीसह कोणकोण उपस्थित?


पुणे : नुकत्याच पार पडलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सी.पी. राधाकृष्णन यांनी विजय मिळवला होता.त्यानंतर आज देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी त्यांना उपराष्ट्रपति‍पदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, जगदीप धनगड उपस्थित होते.

दरम्यान राजीनाम्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तत्पूर्वी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर जगदीप धनखड यांनी त्यांना पत्राद्वारे शुभेच्छा देखील दिल्या होत्या. उपराष्ट्रपति‍पदाची शपथ घेतल्यानंतर सी. पी. राधाकृष्णन यांनी बैठक बोलावली आहे. राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांनी ही बैठक बोलावली. आज दुपारी राज्यसभेच्या सर्व गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सर्व गटनेत्यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, राधाकृष्णन यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे नवीन नियुक्ती होईपर्यंत महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!