मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली दौऱ्यावर ; काय आहे कारण?


पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी तातडीने राजधानी दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे मुख्य नेते सुद्धा दिल्लीला जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होत आहे. संध्याकाळी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे राधाकृष्णन यांचे अभिनंदन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर भाजपसह एनडीएचे सर्व बडे नेते आणि खासदार सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला खास महत्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत जाऊन सी.पी.राधाकृष्णन यांच्यासह भाजप आणि मित्रपक्षांच्या महत्वाच्या नेत्यांची भेटही घेण्याची शक्यता आहे. या भेटीत राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा होऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा हा दौरा खास ठरण्याची शक्यता आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!