मोठी बातमी! आरक्षणाचा जीआर घेतल्यानंतर मनोज जरांगेंची आता नवी मागणी


मुंबई : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं.राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. या जीआर वरून आता सरकारविरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
या निर्णयावरून ओबीसी नेत्यांकडून सरकारवर टीका होत असल्याने काल मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसींसाठी उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी नवी मागणी करत सरकारची कोंडी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी असे म्हटले आहे की, सरकार म्हणजे राज्यातील साडेचौदा कोटी जनतेचे मालक आहेत. तुम्ही ओबीसींसाठी उपसमिती स्थापन केली आहे तर आता आणखी एक काम करा. राज्यातील दलित आणि मुस्लीम समाजासाठीही उपसमिती स्थापन करा. एक उपसमिती शेतकऱ्यांसाठी स्थापन करा आणि मायक्रो ओबीसींसाठी एक वेगळी उपसमिती स्थापन करा,” अशी माहिती मनोज जरांगेंनी केली आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटणार आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले, ओबीसी समाजासाठी उपसमिती गठीत करण्यात आली असेल तर आमची काही नाराजी नाही, विरोध नाही. गोरगरीब ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी हे करण्यात आले असेल तर आमची काही हरकत नाही. पण मी माझ्या समाजास आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!