राज्यातील सर्वात मोठी बातमी!! मराठ्यांचा ऐतिहासिक विजय, सरकारकडून मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागणी मान्य….

मुंबई : राज्यातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज मोठा विजय मिळाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकारने सकारात्मक पवित्रा घेतली आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं. यामुळे मराठ्यांनी एकच जल्लोष केला आहे.

मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यावेळी उपस्थित होते. त्यांनी सरकारचा तयार केलेला मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवला. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना माहिती दिली. आता एका तासात जीआर काढला जाणार आहे.
मनोज जरांगे यांची पहिली मागणी ही हैदराबाद गॅझिटियरनुसार अंमलबजावणी करण्याबाबत होती. राज्य सरकराने ही मागणी मान्य केली आहे. सातारा संस्थानचे देखील एका महिन्यात निर्णय होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत मुंबई खाली होणार असून याबाबत बोलणी सुरू आहे.

छत्रपती घराण्याचे वंशज मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ग्वाही दिली आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतही सरकारने प्रतिसाद दिला आहे. यावेळी एका मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला करेक्शन सुचवलं आहे. याबाबत चर्चा सुरू आहे.
दरम्यान, आपलं म्हणणं होतं ते आपण लेखी स्वरुपात सरकारला निवेदनातून सादर केलं आहे. सरकारचं शिष्टमंडळ हे प्रत पुन्हा एकदा तुमच्या हातात दिली जाईल. तुम्हाला ते मान्य असेल तर तासाभरात सरकार जीआर काढणार आहे, असेही जरांगे यांनी सांगितले आहे.