मराठा आरक्षण आंदोलन : ‘सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही ; जरांगेंचा सरकारला थेट इशारा..

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषण सुरू आहे.आज मंगळवारी (2 सप्टेंबर) उपोषणाचा पाचवा दिवस आहे.या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. दक्षिण मुंबईतील रस्त्यावरील आंदोलकांना हटवून त्यांना आझाद मैदानात थांबावं असं निर्देश न्यायालयांना दिल आहेत. या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान नियमांची पायमल्ली झाल्याचं निरीक्षण नोंदवत काल मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर आता मुंबई पोलिसांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारला’ सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही’ असा इशारा दिला आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला आम्ही दिलेले नियम डावल्याचं सांगत नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार घेत सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. “आमची मागणी मान्य केली नाही तर शनिवारी आणि रविवारी अत्यंत मोठ्या प्रमाणात मराठे मुंबईत येतील आणि मग सोमवारचं आंदोलन छान होईल,” असा सूचक इशारा जरांगे यांनी दिला आहे.
सरकारवर हल्लाबोल करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “कोर्टाने आदेश दिल्यानंतर आम्ही रस्त्यावरच्या गाड्या लगेच हटवल्या आहेत. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही. परंतु मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही. हैदराबाद आणि सातारा संस्थानचे गॅझेटियर लागू करा. मराठा आणि कुणबी एकच आहेत हा शासन निर्णय जारी करा. फडणवीसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये. ते कोर्टाकडे चुकीची माहिती देतात. पण आम्ही आझाद मैदानातून हटणार नाही,” अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे
